अमरावती :
अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीने मिशन आय ए एस त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर हे सात दिवसांचे आहे. या शिबिराचे उद्घाटन दिनांक 16 रोजी तर समारोप 22 तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी आलेले असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी नागपूरचे जिल्हाधिकारी राहिलेले व आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असलेले डॉक्टर बिपिन इटनकर यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई विटणकर या पूर्ण वेळ शिबिरामध्ये थांबून शिबिरार्थीची सुसंवाद साधणार आहे. यापूर्वी देखील श्रीमती शारदाताई विटणकर ह्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरात सात दिवस सहभागी झाल्या होत्या.
डॉक्टर बिपिन इटणकर हे आयएएस झाल्यापासून ते व त्यांच्या मातोश्री डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या संपर्कात आहे. ते जेव्हा आयएएस झाले तेव्हा त्यांच्या त्यांच्या मातोश्रीचा त्यांच्या पत्नीचा व त्यांच्या भगिनींचा सत्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी आयोजित केला होता. डॉक्टर विपिन इटनकर हे एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून श्रीमती शारदाताई ईटणकर यांनी त्यांच्यावर केलेल्या सुसंस्कारामुळे ते या पदावर पोहोचले आहेत माझ्या मुलगा जसा जिल्हाधिकारी झाला तसे इतरही मुले स्पर्धा परीक्षेच्या जगतात पुढे जावेत त्या मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मी अशा प्रकारच्या शिबिरामध्ये सहभागी होऊन मुलांमध्ये मिसळून मुलांमध्ये राहून त्यांना प्रोत्साहन देते असे विचार श्रीमती शारदाताई ईटणकर यांनी यावेळी व्यक्त केले. अमरावतीच्या परतवाडा रोडवरील वडगाव बस स्टॅन्ड जवळी शिखची रिसॉर्ट मध्ये सात दिवस सहभागी होऊन मी जीवनाचा खरा आनंद घेणार आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. एक जिल्हाधिकारी यांची आई शिबिरामध्ये सहभागी होणार आहे हे पाहून शिबिराची मध्ये व संयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
