You are currently viewing कणकवली शहरातील वायू प्रदूषणाची तपासणी

कणकवली शहरातील वायू प्रदूषणाची तपासणी

कणकवली नगरपंचायतकडून राबविला उपक्रम

​​लवकरच अहवाल होणार​ ​प्राप्त​​ ​

कणकवली

​कणकवली शहराची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करत असतानाच शहरातील वायू प्रदूषणासंदर्भातही नगरपंचायतकडून तपासणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली विद्यानगर, गार्बेज डेपो, मच्छी मार्केट आदी ठिका​णची वायू प्रदूषण तपासणी नुकतीच करण्यात आली. पुणे येथील महाबळ एनवीरो इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञानकडून हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित एजन्सीचे तंत्रज्ञ व नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षणचे समन्वयक प्रितिष खैरे, सतीश कांबळे, ध्वजा उचले आदी उपस्थित होते. या एजन्सीकडून शहरातील हवा तपासणीचा अहवाल आल्यानंतरच शहरातील वायू प्रदूषणा संदर्भात बाब स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा