You are currently viewing सावंतवाडी भंडारी मंडळातर्फे 14 व 15 जानेवारी रोजी भव्य जिल्हास्तरीय भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

सावंतवाडी भंडारी मंडळातर्फे 14 व 15 जानेवारी रोजी भव्य जिल्हास्तरीय भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

सावंतवाडी भंडारी मंडळातर्फे 14 व 15 जानेवारी रोजी भव्य जिल्हास्तरीय भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे 14 व 15 जानेवारी रोजी भव्य जिल्हास्तरीय भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यास 25 हजार रुपये तर उपविजेत्यास 15 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा 7 षटकांची राहणार आहे. स्पर्धेत खेळणारा खळाडू हा भंडारी ज्ञातीतील असणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त दोन संघ सहभागी होऊ शकतात. सावंतवाडी जिमखान मैदानावर हा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतून दोन संघाची निवड करून मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय भंडारी चषक स्पर्धेसाठी सहभाग देण्यात येणार आहे.

सहभागी होणा-या तालुक्यातील भंडारी मंडळाच्या संघानी 14 खेळाडूंच्या आपला संघ निश्चित करून 25 डिसेंबरपूर्वी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाकडे पाठवावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर व कार्याध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर यांनी केले आहे. जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका भंडारी मंडळाच्या बैठकीत नुकतेच या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =