शिवराज मराठा विद्यालय साळगावचा एच.एस.सी. निकाल 88%
25 पैकी 22 विद्यार्थी उत्तीर्ण; निकिता देवळी प्रथम, कोमल चव्हाण द्वितीय तर वैष्णवी गडकर तृतीय
साळगाव :
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. परीक्षेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव यांचा निकाल 88% लागला आहे. विद्यालयातून कला व वाणिज्य शाखेतील एकूण 25 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 22 विद्यार्थी यशस्वी ठरले.
या निकालात कुमारी निकिता सुहास देवळी हिने 72.67% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी कोमल प्रशांत चव्हाण हिने 66% गुणांसह द्वितीय, तर वैष्णवी वासुदेव गडकर हिने 61% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे कार्याध्यक्ष श्री. मुकुंद धुरी, संस्था सचिव श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. सलीम तकीलदार, शिक्षक व पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. उमेश प्रभूतेंडोलकर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
