*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित जागतिक हास्य दिनानिमित्त अप्रतिम काव्यरचना*
*”हास्य”*
हास्य रस जीवनी देतो नित्य आनंद
हास्य अमूल्य आहे नैसर्गिक वरदानIIधृII
मनावरील ताण कमी होतो हास्यानं
चेहऱ्यावरील स्नायू ताणले जातात
दैवी देणगी चेहऱ्यावर वाटते प्रसन्नII1II
निसर्ग प्राणी पशुपक्षी डोंगरदऱ्या पाहून
आत्मविश्वास होतो जागृत वृद्धिंगत
हसण्याने वाढते मनुष्याचे आयुष्यमानII2II
सकारात्मकतेनं आनंद होतो द्विगुणीत
हास्यातून विचार पोहोचतात इतरापर्यंत
विनोद निर्मिती विचित्र भाव व्यंगचित्रांतूनII3II
हास्य रुपी कारंजी फुलवावी बगीचांत
चेहऱ्यावर सौंदर्य येते सदा हसण्यानं
आकर्षक व्यक्तिमत्व होते विकसितII4II
नवा अविष्कार प्रसवे मिळे इतर रसांत
मानसिक स्वास्थ्य राहते उत्तम औषध
उत्तम राखते आरोग्य उत्साह वर्धित II5II
हसल्यामुळे राहते मानसिक संतुलन
मानसिक आरोग्यासाठी उपाय रामबाण
प्रसन्न हास्याने होतो सर्वांशी सुसंवादII6II
©️ काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
