विटे, ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार ) आशीर्वादाचा दिवा हा केवळ कार्यक्रम नसून माणुसकीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा सेवा संकल्प आहे असे प्रतिपादन अँड वैभव दादा पाटील यांनी केले.
सेवा संकल्प अभियान आशीर्वादाचा दिवा या उपक्रमाचा संकल्प विटा आणि खानापूर विधानसभा परिसरात भाजपचे युवा नेते अँड वैभव दादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील गरजू वंचित ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या जीवनात आधार आपुलकी आणि आशेचा प्रकाश निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात सेवा संकल्प अभियान अंतर्गत आशीर्वादाचा दिवा हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विटा व खानापूर विधानसभा क्षेत्रात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आशीर्वाद हीच आपली खरी संपत्ती असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांना आवश्यक ती मदत देणे हा प्रमुख या उपक्रमाचा उद्देश असून या माध्यमातून गरजू व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांची मनमुराद संवाद साधून त्यांच्या व्यथेतून बाहेर काढून जीवन जगण्यासाठी एक सेवा एक आशीर्वाद हा एक सकारात्मक बदल आम्ही आदरणीय मोदीजीं च्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या 25 वर्षाच्या समर्पित जनसेवेच्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सेवा समर्पण व्हावी या उद्देशाने एक हात मदतीचा, आपुलकीचा, माणुसकीचा, या विचाराने प्रेरित होऊन हा उपक्रम गावोगावी राबवून गरजवंताला मदतीचा हात गरिब दुर्लक्षिताना एक शब्द आपुलकीचा देण्याच्या उद्देशाने आम्ही राबवला असून विटा शहरात सार्वजनिक ठिकाणी हि आशिर्वादाचा दिवा लावून आमच्या कार्यकर्त्यांनी सेवा संकल्प अभियान राबविले असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले.
