You are currently viewing मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

​मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी | प्रतिनिधी :

मळगाव-रेडकरवाडी येथील स्थानदैवत श्री देव इशवटी येथे दरवर्षीप्रमाणे शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, रात्री उशिरा दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
​यात ​दुपारी २ वाजता या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे गोवा म्हापसा येथील प्रसिद्ध ‘श्री गजवक्र घुमट आरती मंडळ’ यांचा घुमट आरती वादनाचा कार्यक्रम होणार आहे. कोकणी संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या या घुमट आरतीने कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात होईल.
तर ​सायंकाळी ५ वाजता भक्ती संगीताची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. मांद्रे, पेडणे-गोवा येथील ‘स्वरधारा भक्ती नाट्यसंगीत’ प्रस्तुत सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नामांकित कलाकार भक्तीगीते आणि नाट्यसंगीत सादर करतील.
तर रात्री ९ वाजता वेगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध ‘श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा’ यांचा ‘शेषात्मक लक्ष्मी नरसिंह’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
विशेष म्हणजे ​या नाटकामध्ये ‘शेषात्मक नरसिंह’ ही प्रमुख भूमिका मळगावचा सुपुत्र कु. साहिल तळकटकर हा साकारणार आहे. आपल्या स्थानिक कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी मळगाव परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ​​तरी या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा