You are currently viewing जीपॅट-२०२१ परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी अव्वल

जीपॅट-२०२१ परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी अव्वल

सावंतवाडी:
जीपॅट-२०२१ या फार्मसी पदव्युत्तर अभ्यास क्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सलग तिसऱ्या वषी यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रवेश परीक्षेत कॉलेजचे आठ विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये नागेश कलशेट्टी १९३, ऐश्वयाा माधव १९०, हीना काजरेकर १८०, राकेश बारबोले १५८, अस्मिता लोधी १५६, रोहन हरकुळकर १२५, हर्षदा सोनवडेकर १२३ व रवीना सुतार ८७ गुण यांचा समावेश आहे.
जी-पॅट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतात सर्व केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे औषधनिर्माण शास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील उपलब्ध होणार आहे.

या परीक्षेच्या सरावासाठी कॉलेजने स्वतंत्र मार्गदर्शन तासिका घेतल्या होत्या. सर्व तासिका तसेच सराव परीक्षा, अभ्यासाचे सुनियोजन व सर्व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच हे यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले.

सर्व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कायााध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. विजय जगताप, परीक्षा समन्वयक प्रा. विनोद मुळे व प्रा.श्वेता शिरोडकर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 2 =