You are currently viewing खासदार विनायकजी राऊत वाढदिवस अभिष्टचिंतन..

खासदार विनायकजी राऊत वाढदिवस अभिष्टचिंतन..

सिंधूदुर्ग :

कोकणचा सर्वांगीण विकास आणि समाजाप्रती असलेली कनव खासदार विनायक राऊत यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच दिसते लोकाभिमुख आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये खासदार विनायक राऊत यांचा समावेश प्राधान्याने करावा लागेल. ‘बुद्धीवंतांचा मतदार संघ’ अशी देशभरात ख्याती असलेल्या तत्कालीन राजापूर व आताच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथ यांच्यापासून असलेली परंपरा खासदार त्यांनी ही कायम ठेवली आहे. नाद पर यांच्यानंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले प्रा. मधू दंडवते सुरेश प्रभु या संसदपटू प्रमाणेच खासदार विनायक राऊत ही हा वारसा जोपासत आहेत. शेतकरी, मच्छिमार, सर्वसामान्यांच्या हाताला काम महिला बचत गटांना स्वयंपूर्णता मिळावी यासाठी सातत्याने संसदेत आणि मंत्रालयात कार्यरत असणारे खासदार विनायक राऊत यांना परमेश्वर उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य देवो! वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =