You are currently viewing सी वल्ड प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया सुरु करणे बाबत पर्यटन महासंघाच्या माध्यमातून जमीन मालकांनी घेतली उपजिल्हाधिकारी यांची भेट

सी वल्ड प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया सुरु करणे बाबत पर्यटन महासंघाच्या माध्यमातून जमीन मालकांनी घेतली उपजिल्हाधिकारी यांची भेट

– श्री विष्णू मोंडकर,अध्यक्ष,पर्यटन व्यवसायिक महासंघ.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषित होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ होऊन गेला असूनही पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत पर्यटन वाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाही .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय व रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत गरज आहे ती शासन स्तरावर या दिशेने काम होण्याची.पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून बारमाही पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेला आतंराष्ट्रीय प्रकल्पापैकी एक असलेल्या सी वल्ड प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न चालू केला असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांची भेट तोंडवळी ,वायंगणी येथील जमीन मालकासोबत भेट घेऊन सि वल्ड भूसंपादन प्रक्रिया सुरु करणे बाबत भेट घेण्यात आली त्यावेळी जमीन मालकांच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात यात जमीन मालकामार्फत विनंती करण्यात आली की आम्ही सर्व जमीन मालक गाव तोंडवळी,वायंगणी ता.मालवण .जि.सिंधुदुर्ग येथे स्वपांदित वडिलोपार्जित जमिनी असून सदर जमिनी शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी ठरविलेल्या सीवल्ड प्रकल्पासाठी देण्यास तयार आहोत.तसेच या विषय संदर्भात माजी पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल यांच्या अध्यतेखाली मंत्रालय मुंबई येथे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या मिटींग मध्ये सदर प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया संदर्भात आदेश झाले असून तीन वर्षे होऊनही प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे .या विषयी आपल्या स्तरावर भूसंपादन प्रक्रिया चालू करण्याचे आदेश व्हावेत ही विनंती करण्यात आली तसेच या प्रलंबित विषयी आवश्यक त्या पर्यटन विभाग व शासन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी विनंती जमीन मालकामार्फत करण्यात तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे सदर प्रोजेक्ट मुळे पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगार क्षेत्रात जिल्ह्या राज्यात अग्रेसर होऊ शकतो या संधर्भात पर्यटन महासंघ अध्यक्ष श्री विष्णु मोंडकर यांनी महासंघाची जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी सदर प्रोजेक्ट ची आवशक्यता स्पष्ट केली यावर बोलताना उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी सदर जमीन मालकांच्या मागणी विषयी शासन स्तरावर मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले यावेळी जमीन मालक श्री हनुमंत प्रभू ,श्री आनंद जामसंडेकर ,श्री श्रीकांत गिरकर ,श्री आत्माराम कुमठेकर तसेच पर्यटन व्यवसाययिक महासंघ पदाधिकारी श्री नकुल पार्सेकर ,श्री मंगेश जावकर,श्री किशोर दाभोलकर हे उपस्थित होते .

आम्ही सर्व जमीन मालक असून गाव तोंडवळी ता.मालवण .जि.सिंधुदुर्ग येथे स्वपांदित वडिलोपार्जित जमिनी असून सदर जमिनी शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी ठरविलेल्या सीवल्ड प्रकल्पासाठी देण्यास तयार आहोत.
वरील विषय संदर्भात माजी पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल यांच्या अध्यतेखाली मंत्रालय मुंबई येथे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या मिटींग मध्ये सदर प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया संदर्भात आदेश झाले असून तीन वर्षे होऊनही प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे .या विषयी आपल्या स्तरावर भूसंपादन प्रक्रिया चालू करण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती जमीन मालक यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 7 =