You are currently viewing सहकार विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक नारायण जोग यांचे निधन

सहकार विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक नारायण जोग यांचे निधन

सावंतवाडी

सहकार विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक नारायण विठ्ठल जोग (८४, रा. साटेली तर्फ सातार्डा ) यांचे निधन झाले. वेंगुर्ले व कुडाळ तालुक्याचे सहाय्यक निबंधक सहकार या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. जी.डी.सी.ए.झालेल्या जोग यांनी अखंड रत्नागिरी जिल्हा असतांना राजापूर येथून सहकार विभागातील सेवेला सुरुवात केली होती.

श्रीवर्धन-रायगड, चिपळूण येथे नोकरीतील सुरुवातीच्या काळात काम केल्यावर त्यांना सहकार विभागाने विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामध्ये पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक, मुंबई येथे विशेष वसुली अधिकारी म्हणून त्यांनी योगदान दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाल्यावर ते सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले येथे कार्यरत होते. १९५४ च्या सुमारास पंचद्रवीड संस्था सचिवांच्या अकाली निधनाने अडचणीत येऊन अवसायनात जात असतांना जोग यांनी ही संस्था पुनर्जिवीत करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

देवगड खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक वासुदेव विठ्ठल जोग यांचे ते बंधु होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सूना,नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =