पोलीस कॉन्स्टेबल अनिल शेट्ये यांची गळफास घेत आत्महत्या…
वैभववाडी
पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेट्ये (वय ४०) यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ते मानसिक आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर कोल्हापूर येथे वैद्यकीय उपचार सुरू होते.
अनिल शेट्ये हे गेल्या १२ वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत होते. त्यांच्या पोलीस सेवेची सुरुवात वैभववाडी पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानंतर त्यांची बदली विजयदुर्ग येथे झाली आणि सहा महिन्यांपूर्वीच ते पुन्हा वैभववाडी येथे रुजू झाले होते. आजारपणामुळे त्यांनी यापूर्वी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे वैभववाडी पोलीस ठाण्यात शोककळा पसरली आहे.