You are currently viewing सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन 12 व 13 रोजी

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन 12 व 13 रोजी

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला चे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 12 व 13 जानेवारी 2023 असे होणार आहे. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये 12 रोजी बक्षीस समारंभ, सायन्स एक्जीबिशन, व फनफेअरचे आयोजन करण्यात आले आहे, गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता शाळेच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. विनायक नाबर बी. आर्च (I.I.T. खरगपूर) M.Des. (I.I.T. बॉम्बे) संचालक – ACA/ACDS, तसेच मा. श्रीमती के. मंजुलक्ष्मी (I.A.S.) जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा या असणार आहेत. सन्माननीय अतिथी मा. श्री.इर्शाद शेख (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग विद्या निकेतन), व श्री प्रशांत नेरुरकर (संचालक सिंधुदुर्ग विद्या निकेतन) हे आहेत.

शुक्रवारी दिनांक 13 जानेवारी ला वार्षिक स्नेहसंमेलन व फनफेअर संध्याकाळी 6.00 वा. शाळेच्या प्रांगणात होणार आहे.श्रीमती मनीषा लॉरेन्स डिसोझा (मुख्याध्यापिका), मिस चिन्मयी आंगचेकर,(लिडर), कु. चिन्मय मराठे (सचिव), विद्यार्थी प्रतिनिधी यांनी वार्षिक स्नेहसंमेलनास विद्यार्थी, पालक, तसेच मित्र परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 7 =