You are currently viewing पेडणे गोवा तेथे कोरोना प्रतिबंधक फवारणी….

पेडणे गोवा तेथे कोरोना प्रतिबंधक फवारणी….

संजू विरनोडकर टीम ची कामगिरी…

कोरोनाचा वाढता प्रभाव व मृत्यूचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या जनजीवनावर होणारा परिणाम याची गंभीर दखल घेऊन गोवा व महाराष्ट्र सीमेलगत असणारे गाव तोरसे पेडणे, गोवा येथिल अमोल नाईक यांच्या पुढाकारातून परब वाडा व रांजण वाडा येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून या दोन्ही वाडीवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. आता गोव्यात देखील नागरिक स्वतः पुढाकार घेऊन करोनशी लढा देत आहेत. याचं हे उत्तम उदाहरण आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा येथे कामानिमित्त व एकमेकांचे नातेवाईक दोन्ही ठिकाणी असल्यामुळे दोन्ही राज्यात नेहमी नागरिकांची वर्दळ असते तोरसे येथील अमोल नाईक यांनी संजू विरनोडकर टीमचं सेवाभावी कार्य पाहून अमोल नाईक यांनी आपल्याही गावात निर्जंतुकीकरण फवारणी करावी अशी विनंती संजू विरनोडकर याना केली. संजू वीरनोडकर टीमचे सहकारी संतोष तळवणेकर, सागर मळगावकर तुषार बांदेकर, बंटी जामदार, भूषण नाईक, ज्ञानेश्वर पाटकर, मंदार पिळणकर, प्रदीप तोरस्कर, मयूर नाईक, विद्याधन तोरसकर, राजेंद्र नाईक, गोविंद नाईक, यांनी याठिकाणी घरोघरी व सार्वजनिक ठिकाण कोविंड प्रतिबंधक फवारणी करत सामाजिक बांधिलकी जोपासली. संजू वीर नोडकर टिंमची आता गोवा राज्यातील नागरीकानी दखल घेतल्याने गोव्यात या टिमला अनेक ठिकाणहुन मागणी येत आहे. तरीपण आपले जिल्ह्यातील कोरोना बाधित क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्या प्राधान्य देण्यात येईल असे संजु विरनोडकर टीमचे संतोष तळवणेकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − twelve =