*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मनाचा.. सेल्फी ….!!*
असंख्य ह्दये जमवली
फुलेचं फुले जमवली
प्रसंगी उन्मळून रडणारी
माणसही….गोळा केली…
आक्रसलेली मनातील गर्दी
मनाच्या ..सेल्फीतून फुटली
ठाणबंद ..अंगरखा चढवून
कडकडून ..मीठी मारली..
इलाखा मनाच्या सेल्फीचा
जीव …लावत गेला
बेवफाई ऐकलीच नाही
बेसावध तख्तावरून उतरला..
मनपिंज-याला.. भानचं नाही
सुखासुखी… कसली घालमेलं
पेरले…स्वप्नांचे आवेगी संदेश
सेल्फीचं मन.. देहात सुखावलं..
अजूनही कुणी ..मनाला
बंधनातून..सोडून गेलं नाही
ओळखीचे सारे परकेचं
सेल्फीतून ..उतरले नाही..
मनात होते नवखे
सेल्फीला सांगावेसे वाटेना
परस्परांचा अंदाज चुकला
मौन भोवले नजरा भिडवतांना..
बाबा ठाकूर
