You are currently viewing संजू परब यांनी माझ्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या : निलेश राणे
Oplus_16908288

संजू परब यांनी माझ्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या : निलेश राणे

भाऊ आणि मित्र म्हणून दिलेला पाठिंबा कधीही विसरणार नाही; येणाऱ्या काळात विश्वासाची परतफेड करणार

सावंतवाडी :

संजू परब यांनी एक भाऊ आणि मित्र म्हणून माझ्या राजकीय जीवनात दिलेला पाठिंबा मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना काय दिले आणि काय देऊ शकतो, हे मला माहिती नाही. परंतु येणाऱ्या काळात त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांनी आज येथे दिला.

दरम्यान, या ठिकाणी केवळ उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्यामुळे मला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी वैभव नाईक निवडणूक लढवण्यासाठी तयार होते. परंतु त्यांना बाजूला सारून मला संधी दिली, असा गौप्यस्फोट करीत येणाऱ्या काळात उदय सामंत आणि दीपक केसरकर सोबत असतील तर तुला तुझं स्वप्न पूर्ण करणे कठीण असे काहीच नाही, असेही त्यांनी सांगितले.

श्री. परब यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी निलेश राणे यांनी संजू परब यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते म्हणाले की, माझा घरचा सहकारी आणि सावलीसारखा उभा असणारा व्यक्ती म्हणून संजू परबांचे नाव प्रकर्षाने घेता येईल. ज्यावेळी मी दहा वर्षे राजकारणापासून दूर, आमदार नव्हतो, त्यावेळी मला पुन्हा पुन्हा मतदार संघात आणण्याचे आणि प्रवाहात ठेवण्याचे काम त्यांनी केले.

विशेष म्हणजे त्याला अन्य पक्षातून अनेक वेळा ऑफर आल्या. मात्र ऑफर आल्यानंतर मला ऑफर आली आहे आणि ती कितीची आहे हे त्यांनी मला फोन करून सांगितले. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या कधी अंतर पडू दिले नाही. आज ते दीपक केसरकरांसोबतही प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांचा शब्द पाड देत नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होणार आहे.

संजू परब प्रामाणिक कार्यकर्ता आहे. भेसळ होणार नाही, कोणाशी तडजोड करणार नाही, अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून निश्चितच त्याला संधी मिळेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, संजू परब यांनी माझ्यासाठी अनेक खस्ता खाल्ले आहेत. माझ्या विरोधात त्यांनी अनेकांना अंगावर झेलले आहे. माझ्यावर टीका केल्यानंतर प्रथमच ते त्या टीकेला उत्तर देतात. आज दीपक केसरकरांवर टीका झाल्यानंतरसुद्धा त्यांची तीच भूमिका असते. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना निश्चितच योग्य ती संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा