You are currently viewing वैभववाडीत ‘सेवा संकल्प अभियान’; मॅरेथॉनमधून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
Oplus_16908288

वैभववाडीत ‘सेवा संकल्प अभियान’; मॅरेथॉनमधून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश

पंचायत समितीच्या वतीने आयोजन; नागरिक, अधिकारी, कर्मचारी व भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वैभववाडी : पंचायत समिती, वैभववाडी यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून आरोग्य, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

मॅरेथॉनमध्ये नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील सहभागींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ‘फिट वैभववाडी, निरोगी वैभववाडी’ या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम जनजागृतीसोबतच समाजातील सकारात्मक सहभागाचे उदाहरण ठरला.

यावेळी उपसभापती सौ. साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद रावराणे, श्री. श्रावणी रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकासे, गटविकास अधिकारी श्री. प्रेमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, पंचायत समिती सदस्य श्री. देवानंद पालांडे, श्री. मंगेश लोके, सौ. सुवर्णा संसारे, सौ. साधना नकासे यांच्यासह सर्व पदाधिकारी, पंचायत समिती कर्मचारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

मॅरेथॉनच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वैभववाडीमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

प्रतिक्रिया व्यक्त करा