You are currently viewing कृषी महाविद्यालय सांगुळवाडी बीएससी ऍग्री च्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण…

कृषी महाविद्यालय सांगुळवाडी बीएससी ऍग्री च्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना वृक्ष देऊन केला सत्कार…

वैभववाडी

कृषी महाविद्यालय सांगुळवाडी बीएससी ऍग्री च्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कार्यानुभव) उपक्रमांतर्गत रविवारी नाधवडे येथे वृक्षारोपण केले. याप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाधवडे सरपंच आदिती नारकर होत्या तसेच यावेळी उपसरपंच सूर्यकांत कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय तावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे व जेष्ठ नागरिक महादेव कुडतरकर व ग्रामपंचायत सदस्य लीना ताई पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग पावसकर, माजी उपसभापती बंडू मांजरेकर व इतर मान्यवर त्यासोबत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच पोलीस नाईक अमलदार राहुल पवार हे उपस्थित होते. सुधीर नकाशे व प्रमुख पाहुन्यांनी शेतकरी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय सांगूळवाडी येथील विद्यार्थी ओंकार निकम, शुभम काळोखे, अक्षय डुकरे, सुहास पवार, अक्षय थोरात, मयुरेश सानप, शुभम गायकवाड, तेजस जाधव व रोहित पैलवान यांनी केले. ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय याचे प्राचार्य तेजस गायकवाड, उपप्राचार्य प्रियांका मिस्त्री व प्राध्यापक विवेक कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा