You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे  – एकनाथ नाडकर्णी 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे  – एकनाथ नाडकर्णी 

L” हर घर तिरंगा ” अभियान संयोजक , भाजपा सिंधुदुर्ग .

प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांने आपल्या घरावर तिरंगा फडकवा ..

भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण करणार आहे . आपण सगळेच या अत्यंत अदभुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत . देवाने आपल्याला हे खुप मोठे सौभाग्य दिले आहे . पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी साथ देत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान स्वराज्य मोहस्तवात उस्फूर्तपणे सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करुया , असे प्रतिपादन भाजपा ” हर घर तिरंगा ” अभियानाचे जिल्हा संयोजक एकनाथ नाडकर्णी यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले .
वेंगुर्ले भाजपा कार्यकर्त्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ” *स्वराज्य मोहस्तव २०२२* ” व ” *हर घर तिरंगा* ” या अभियानाची माहिती दिली . तसेच वेंगुर्ले तालुक्यातील ९३ बुथवर भाजपा चे बुथप्रमुख व बुथकमीटीतील कार्यकर्ते प्रत्येक बुथमधील कुटुंबाला तिरंगा मिळाला की नाही याची खातरजमा करून तो झेंडा कशा प्रकारे लावावा याबाबत माहिती देतील , तसेच सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करतील असे नियोजन करण्यात आले .
तसेच वेंगुर्ले तालुक्यात तिरंगा मोटरसायकल रॅली , स्वच्छता अभियान , महिला बचत गटांना मार्गदर्शन , तिरंगा सायकल रॅली , शेतकरयांना मार्गदर्शन , तिरंगा दौड , वृक्षारोपण , मशाल फेरी , प्रभात फेरी , देश भक्तीपर समूहगीत स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर यांनी एकनाथ नाडकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .तसेच नगराध्यक्ष राजन गीरप यांनी वेंगुर्ले शहरातील अमृतमहोत्सव कार्यक्रमाची माहिती दिली व शहरातील कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष – प्रीतेश राऊळ – मनवेल फर्नांडिस – लक्ष्मीकांत कर्पे , युवा मोर्चाचे संदीप पाटील – तुषार साळगांवकर – भुषण सारंग , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.चिटणीस जयंत मोंडकर , जेष्ठ नेते प्रकाश रेगे , अॅड. जी.जी.टाककर , महिला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला मोर्चाच्या – वृंदा गवडंळकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब – सारिका काळसेकर , *शक्ती केंद्र प्रमुख* – महादेव नाईक ( आरवली ) – जगंन्नाथ राणे ( रेडी ) – संतोष शेटकर ( तुळस ) – नितीन चव्हाण ( वजराठ ) – कमलेश गावडे ( पाल ) – सुधीर गावडे ( वेतोरे ) – विजय बागकर ( आसोली ) – विद्याधर धानजी (शिरोडा ) – सुनील चव्हाण ( परुळे ) – रुपेश राणे ( कुशेवाडा ) – निलेश मांजरेकर ( उभादांडा ) , तुळस सरपंच शंकर घारे , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , शिरोडा शहर अध्यक्ष संदिप धानजी , ता.का.का.सदस्य सुनील घाग , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , *बुथप्रमुख* – शेखर काणेकर – नारायण गावडे – पुंडलिक हळदणकर – वसंत परब इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =