You are currently viewing सिंधुदुर्गनगरी विकासाला गती; रस्ते, स्मारक सुशोभीकरण व सोलार हायमास्टसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्गनगरी विकासाला गती; रस्ते, स्मारक सुशोभीकरण व सोलार हायमास्टसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्गनगरी विकासाला गतीरस्तेस्मारक सुशोभीकरण व सोलार हायमास्टसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत प्राधिकरण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले.

बैठकीला प्राधिकरणाच्या सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठेअशासकीय सदस्य प्रभाकर सावंतमहेश ऊर्फ छोटू पारकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्राधिकरण क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरणव्यापारी संकुल उभारणी तसेच जिल्हा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी स्वागत कमानीचा आराखडा सादर करण्यास सांगितले.

शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करणेतसेच पाणी गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.

दरम्यानस्वच्छतेच्या दृष्टीने प्राधिकरण क्षेत्रात कचरा संकलनासाठी दोन नवीन कचरा गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रमुख रस्त्यांवर सोलार हायमास्ट दिवे बसविण्याचा ठराव संमत करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा