You are currently viewing सौ. संजना सावंत यांची कोविड सेंटरला भेट…

सौ. संजना सावंत यांची कोविड सेंटरला भेट…

 

कुडाळ :

सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करताना कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था नेहमीच अग्रणी राहिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण संस्थेमध्ये covid- केअर सेंटर साठी जागा उपलब्ध करून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी शासनाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या कोव्हीड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, यांनी भेट दिली. सोबत कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन  आईर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष रणजित देसाई, चेअरमन उमेश गाळवणकर, डॉक्टर संजय निगुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश कांबळे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी व अधिकारी उपस्थित होते.

या कोव्हीड सेंटरची पाहणी केली व सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. उमेश गाळवणकर व त्यांची संस्था जे सामाजिक काम करत आहे त्याचे कौतुक करत, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारला अशा प्रकारचा सहकार्यासाठी विविध संस्थानी पुढे आलं पाहिजे, असे प्रतिपादन संजना सावंत यांनी केलं. आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी या कोव्हीड सेंटरचा कशा पद्धतीने कधी वापर केला जाणार आहे, कोणत्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.? इथल्या युनिटच कोणतं काम असणारा? ते काम कोणत्या पद्धतीने चालणार आहे.याची उपस्थितांना माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 6 =