कुडाळात मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर
तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर उपचार; नागरिकांनी लाभ घ्यावा, आयोजकांचे आवाहन
कुडाळ :
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांच्या सहकार्याने मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व श्री देवी भावई सेवाभावी सामाजिक संस्था, झाराप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत केंद्र शाळा झाराप नं. १, श्री देवी भावई मंदिराजवळ, ता. कुडाळ येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये विविध व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब, अॅलर्जी, त्वचारोग, पचनसंस्थेच्या समस्या, हाडे व सांध्यांचे आजार, पक्षाघात व वातविकार, मूळव्याध, भगंदर, बालरोग, स्त्रीरोग तसेच इतर जुनाट विकार यांचा समावेश आहे.
तसेच रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य आहार-विहार, योग व आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या सेवाभावी उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२०९०६६९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
