You are currently viewing कला ऊत्सवासाठी 10 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कला ऊत्सवासाठी 10 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासनाच्या  कलाउत्सवामध्ये सहभागी होण्यायसाठी 10 डिसेंबर 2022 पर्यंत इच्छुकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन अनुपमा तावशीकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे.

 जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरिल विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येतो.यंदाच्या वर्षीया उत्सावमध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, व्दीमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे व नाट्य (भूमिका अभिनय) या 10 संघ पातळीचा समावेश आहे.

            कला उत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (SOLO) सहभाग असणार आहे. विद्यार्थी केवळ एका कलाप्रकारातच सहभाग घेऊ शकतो. इतर व्यावसायिक कलाकरांचा सहभाग  किंवा मदत घेता येणार नाही. 4 ते 6 मिनिटांचा व्हीडिओ मोबाईल अथव कॅमेराव्दारे तयार करावा. व्हीडिओतील चित्र व आवाज स्पष्ट असावे. तयार केलेला व्हीडिओ व सोबत कला सादर करतानाचे पाच फोटो विद्यार्थ्यांने स्वत:च्या, पालक, शिक्षकांच्या फेसबूक, इंस्टग्राम, व्टिटर किंवा युट्युब अकाऊंट वरुन #kalautsamah2020 या हॅशटॅगचा वापर करुन दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोस्ट करावी. व्हीडिओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा UDISE क्र. तालुका, जिल्हा, मेल आय.डी.संपर्क क्रमांक व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा.

            विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav या पोर्टल वर जाऊन करावी. आधिक माहितीसाठी  मानस देसाई मो. 9422146184 व वर्षा कांबळ,अधिव्याख्याता मो. 9625460992 समता विभाग प्रमुख, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − one =