You are currently viewing कवी शाहीर मनोहर पवार यांचा राष्ट्रीय कवी संमेलनात   मायमराठीचा डंका!

कवी शाहीर मनोहर पवार यांचा राष्ट्रीय कवी संमेलनात  मायमराठीचा डंका!

स्त्री वंशाला नष्ट करोनी । कलंक माथी लावू नका ॥

कवी शाहीर मनोहर पवार यांचा राष्ट्रीय कवी संमेलनात  मायमराठीचा डंका!

 

गुजरात वलसाड :(बबनराव आराख) येथिल स्थानिक ‘अक्षर महल ‘येथे भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच आयोजित – ४ थे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन स्वामी नारायण मंदीर समुद्र किनारा येथे भव्य दिव्य थाटात पार पडले यात बुलढाणा केळवद येथून शाहीर मनोहर पवार आमंत्रीत कवी म्हणून हजर होते त्यांनी नारी सन्मान ‘ आणि बेटी बचाव शाहीरी काव्य सादर केले.

आयोजक सौ . भाग्योदय लेखणी साहित्य मंच अध्यक्षा संस्थापक भाग्यश्री बागड वलसाड गुजरात आणि राकेश बागड प्रदिप बडदे मुंबई ‘ यांनी सदर ४ थ्या राष्ट्रीय काव्य संमेलनाचे आयोजन केले. त्यामध्ये संमेलन अध्यक्ष महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी, गायक, मा . प्रा . प्रशांत दादा मोरे मुंबई आणि स्वागताध्यक्ष मा डॉ . चंद्रकांत कोठावदे भोईसर कार्यक्रमाचे उद्घाटक मा . शरद चितोडकर वापी, तसेच प्रमुख अतिथी मा .संदीप राक्षे, कवी लेखक पुणे, कवी नितीन वायाळ, आणि कवी प्रदिप बडदे मुंबई आदींच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रीत कवींचे कवी संमेलन पार पडले . त्यात पारितोषिक वितरण करण्यात आले . तसेच पुस्तक पृकाशन उपस्थित मान्यवराचे हस्ते करण्यात आले . यावेळी दिप प्रज्वलन करून सनई चौघडा आणि शंख वादन करीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. त्या मध्ये आंतरराष्ट्रीय सनई चौघडा वादक श्री रमेश पाचंगे पूणे, भरत पाचंगे तुतारी वादक आणि गजानन जावरकार बुलढाणा शंखवादन यांनी मंगलमय वातवरण केले. या काव्य मैफलीत विविध विषयाला अनुसरून काव्यरचना सादर करण्यात आल्या . गोवा, गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोंकण, मुंबई, आदी वेगवेगळ्या भागातून प्रांतातून ४० कवी हजर होते.बुलढाणा येथून डॉ कवी मंजुराजे जाधव, कवी संजय हिवाळे केळवद, यांनीही सुंदर काव्य रचना सादर केल्या. शाहीर मनोहर यांनीशाहीरी फटका,काव्य सादर करून रसिकांची दाद मिळविली. कवी हरिष दळवी, प्रमोद सुर्यवंशी, राहूल भोवटे, तसेच अनुकुल माळी, आनंद ढाले, यांच्या कविता, गझल,लक्षनिय ठरल्या. संमेलन अध्यक्ष प्रशांत दादा मोरे यांनी रसिकांनाआपल्या गोड पहाड़ी आवाजाने मंत्रमुग्ध केले.बहारदार सुत्रसंचालन सौ. स्नेहल येवला यांनी केले सोबत ख्यातनाम कवी, बाळासाहेब गीरी यांनीं कार्यक्रमात रंगत आनली. स्नेहभोजन, समुद्राची सैर दर्शन आणि स्वामीनारायणाचे नयनरम्य मंदीर प्रेक्षणिय होते. राष्ट्रिय कवी संमेलन यशस्वी करण्यास प्रविण बडदे, राकेश बागड, तसेच सौ. भाग्यश्री बागड यांनी अथक परिश्रम घेतले. आणि या मायमराठीचा पताका पर प्रातांत हिंद महासागरात समुद्राकाठी रोवला. त्यांच्या अस्मरणीय, कार्याला हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा