You are currently viewing कणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा…

कणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा…

कणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा…

महापुरुष मित्रमंडळातर्फे आयोजन; 5 ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार स्पर्धा…

कणकवली

कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे ५ ते ७ एप्रिल या कालावधीत झेंडा चौकात मांडावरील हास्यकल्लोळ व राधानृत्य रोंबाट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

५ ते ६ एप्रिल या कालावधीत रात्री ९ वा. मांडवरील हास्य कल्लोळ स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १०,००० रु., ८,००० रु. ६,००० रु. व आकर्षक चषके अशी बक्षीसे आहेत. ७ रोजी रात्री ९ वा. राधानृत्य रोंबाट स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १२,००० रु. १०,००० रु., ८,००० रु.व आकर्षक चषके अशी बक्षीसे आहेत. हास्य कल्लोळ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी प्रद्युम मुंज (९५४५१२१६१६), चेतन अंधारी तर राधानृत्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी प्रज्वल वर्दम (७५८८८९९६००) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

हास्य कल्लोळ स्पर्धेत प्रहसन, विडंबन, विनोद नाटकातील प्रसंगी, स्वरचीत विनोदी प्रसंग, निखळ मनोरंजन करणारे विनोद प्रसंग असे कलाप्रकार कालाकार सादर करणार असून रसिकांसाठी हास्य विनोदी आणि मनोरंजन यांचा एकत्रित मिलाफ अनुभवता येणार आहे. राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत पौराणिक नृत्याविष्कार पाहता येणार आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + eight =