डी. जी. बांदेकर ट्रस्टतर्फे सावंतवाडीत ‘अक्षर लेखन’वर मोफत कार्यशाळा
सावंतवाडी :
सावंतवाडी : प्रतिनिधी
डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने ‘अक्षर लेखन’ या विषयावर मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा उद्या सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली असून प्राध्यापक श्री. सिद्धेश नेरुरकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळा इयत्ता दुसरीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून अक्षरलेखन सुधारण्यासाठी व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ही कार्यशाळा बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट), सावंतवाडी येथे होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ९४२०२६०९०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
