You are currently viewing दिवाळी अंकासाठी आयोजित खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर….

दिवाळी अंकासाठी आयोजित खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर….

डॉ. हर्षदा देवधर जिल्ह्यातून प्रथम, तर द्वितीय सरिता पवार

वेंगुर्ले

पुणे येथील जेष्ठ साहित्यीक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ले येथील ” किरात दिवाळी अंक ” यासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रोत्साहनपर आयोजित केलेल्या खुल्या कथालेखन स्पर्धेत डॉ.हर्षदा देवधर ( झाराप ) यांनी प्रथम, सरिता पवार ( कणकवली ) द्वितीय तर प्राजक्ता आपटे ( वेंगुर्ले ) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उर्वरित निकालामध्ये श्वेतल परब ( सावंतवाडी ) चतुर्थ, मुग्धा शेवाळकर ( दोडामार्ग ) पाचवा, आणि कल्पना मलये ( कणकवली ) सहावा यांचा समावेश आहे. स्पर्धेचे परीक्षण साहित्यीक वीरधवल परब यांनी केले . विजेत्या १ ते ६ क्रमांकाच्या कथांचा समावेश किरात च्या दिवाळी अंकात करण्यात आला आहे. सर्व विजेत्यांना रोख रक्कमेसह अरुण सावळेकर लिखित ” नाट्यरंग ” या दीर्घाणकिकेची प्रत दिवाळी अंकासोबत भेट देण्यात येणार आहे. विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + eight =