You are currently viewing चंपा म्हणणं थांबवा अन्यथा…

चंपा म्हणणं थांबवा अन्यथा…

अजित पवारांना इशारा…

 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी पंढरपुरात सभेत बोलताना पुन्हा एकदा ‘चंपा’असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचलं होतं. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो असा टोला त्यांनी लगावला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

“अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 13 =