You are currently viewing राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम

राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम

राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम

वेताळ प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने सलग अकराव्या वर्षी लिहित्या हाताना व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत अगदी संपूर्ण महाराष्ट्र मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्गसह अगदी मुंबई, पुणे,रत्नागिरी कोल्हापूर, सातारा, नाशिक शिर्डी, जळगाव, रत्नागिरी,बारामती, अहमदनगर, वाशीम आदी ठीकाणाहून स्पर्धक सहभागी झाले.

शालेय गटासाठी ‘आज शिवराय असते तर’हा वैचारिक विषय देण्यात आला होता. या विषयावर व्यक्त होताना स्पर्धेत तब्बल १५१ शालेय विद्यार्थी सहभागी झाले. निबंध स्पर्धा – शालेय गट : प्रथम क्रमांक: अश्मी प्रविण भोसले (अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी), द्वितीय क्रमांक: शिवानी रत्नाकर फुटल (अर्जुन रावराणे विद्यालय,वैभववाडी), तृतीय क्रमांक: श्रावणी राजन सावंत (कलंबिस्त इंग्लिश स्कूल) तर उत्तेजनार्थ प्रथम: दिप्ती तिमाजी गवसकर (सरस्वती विद्यालय आरवली,टाक), उत्तेजनार्थ द्वितीय: ईश्वरी संजय इंगोले (जि.प. माध्य.विद्यालय, मंगरूळपीर,वाशीम) यांनी पटकाविला.

तर खुल्या निबंध स्पर्धेसाठी *

‘रिल्स स्वैराचारला आमंत्रण देतात का?’ हा आगळा,-वेगळा विषय देण्यात आला होता, या विषयावर अनेकांनी आपले परखड विचार व्यक्त केले. खुल्या गटात एकूण ५८ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. निबंध स्पर्धा – खुला गट, प्रथम क्रमांक: मंदार सदाशिव चोरगे (वैभववाडी), द्वितीय क्रमांक: किशोर अरविंद वालावलकर (सावंतवाडी), तृतीय क्रमांक: डॉ. राजेश जोशी (सातारा), उत्तेजनार्थ प्रथम: निता नितिन सावंत ( सावंतवाडी), उत्तेजनार्थ द्वितीय प्रीतम सदानंद चौगुले (कणकवली) निबंध स्पर्धचे परीक्षण बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले चे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. पी.आर. गावडे यांनी केले.सर्व विजेत्यांचे रोख पारितोषक, प्रमाणपत्र आणि चषक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा