You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातून उद्या मराठा बांधवांची सभा व भव्य रॅली

दोडामार्ग तालुक्यातून उद्या मराठा बांधवांची सभा व भव्य रॅली

दोडामार्ग तालुक्यातून उद्या मराठा बांधवांची सभा व भव्य रॅली

*दोडामार्ग*

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांचा जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यानिमित्त जनजागृती करण्यासाठी शनिवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. साटेली- ‘भेडशी येथे अॅड. सुहास सावंत व आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम यांचे मार्गदर्शन व त्यानंतर भव्य कार रॅली काढण्यात येणार आहे. समस्त मराठा बांधवांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग तालुका अध्यक्ष अॅड. सोनू गवस व सचिव उदय पास्ते यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केले होते. या उपोषणाची सरकारने दखल घेतली व ४० दिवसांतआरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जरांगे- पाटील यांनी पुन्हा बुधवारपासून आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाला अ. भा. मराठा महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच जनजागृती करण्यासाठी साटेली-भेडशी येथे शनिवार २८ रोजी स.१० वा. सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर भव्य कार रॅलीला सुरुवात करून दोडामार्ग, बांदा, शिरोडा ते मठ वेंगुर्ला अशी नेत पहिल्या दिवसाची समाप्ती होणार आहे. या सभेला व रॅलीला मराठा बांधवांनी आपल्या गाडीसह उपस्थित राहण्याचे आवाहन एड. सोनू गवस व सचिव उदय पास्ते यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा