You are currently viewing मळगाव वाचनालयाचा कै.यशवंती धोंडू पटेकर पुरस्कार डॉ.सौ.अश्विनी मिलिंद खानोलकर यांना जाहीर

मळगाव वाचनालयाचा कै.यशवंती धोंडू पटेकर पुरस्कार डॉ.सौ.अश्विनी मिलिंद खानोलकर यांना जाहीर

सावंतवाडी :

मळगाव येथील कै .प्रा .उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा कै.यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार यावर्षी सावंतवाडी येथील बालरोगतज्ञ डॉक्टर सौ.अश्विनी मिलिंद खानोलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. या सन्मान सोहळ्यासाठी लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक मा.श्रीमती कावेरी कासरलकर , प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी वाचनालयाच्यावतीने कर्तृत्ववान महिलेला सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शाल श्रीफळ, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाच्या संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा