You are currently viewing गोमाता सहवास उपचार केंद्राचे वालावल येथे उद्घाटन

गोमाता सहवास उपचार केंद्राचे वालावल येथे उद्घाटन

कुडाळ:

वालावल येथे गोमाता सहवास उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारचे हे दुसरे उपचार केंद्र आहे.

या केंद्राचे उद्घाटन वालावल येथील गोपालक अशोक मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. संजोग साळसकर व गुरूदास प्रभू यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी गुरुदास प्रभू, डॉ. संजोग साळसकर, गुरूदास प्रभू, ॲड वरूण ठाकूर, प्राथमिक निवृत्त शिक्षक सुभाष प्रभू, किरण प्रभू आदी उपस्थित होते. दिवाळीत येणाऱ्या वसुबारसला विशेष महत्त्व आहे. यादिवशी गायीला विशेष असे स्थान हिंदू धर्मात देण्यात आले आहे.

यादिवशी गायीचे स्मरण करून तिची पूजा केली जाते. असे महत्व असलेल्या या वसुबारस दिनानिमित्त गोमाता सहवास उपचार केंद्र वालावल किरण प्रभू यांच्या घरी सुरू करण्यात आले. डॉ दत्तप्रसाद प्रभू यांनी गायीचे महत्व तसेच गाईच्या दुधामुळे होणारे फायदे सांगितले तसेच जर्सी गायच्या दुधामुळे होणारे दुष्परिणामही यावेळी सांगितले. पंधरा दिवसांनी मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊया असे निवृत्ती प्राथमिक शिक्षक सुभाष प्रभू यांनी सांगितले. तसेच गुरुदास प्रभू यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पंधरा पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या विषयावरती वर्ग घेण्याचे सुचविले. आयुर्वेदामध्ये काळ्या गाईचे तांबड्या गाईचे व पांढऱ्या गाईचे महत्व सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =