बोर्डवे येथे प्रस्तावित रेल्वे स्टेशन मंजुरीसाठी २७ फेब्रुवारीपासून उपोषण व रेल रोको आंदोलन सुरु
कणकवली
बोर्डवे येथे प्रस्तावित रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रौ १२ वाजल्यापासून उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. प्रसंगी रेल रोको आंदोलनही करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
हे आंदोलन बोर्डवे रेल्वेफाटक येथे पार पडणार असून, चंद्रहास राणे यांच्या नेतृत्वाखाली बोर्डवे रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समिती सक्रिय सहभाग नोंदविणार आहे.
प्रस्तावित रेल्वे स्टेशनला लवकरात लवकर मंजुरी मिळावी व स्थानिक नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण व्हावी, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
