You are currently viewing जिल्हा बॅंकेला मिळालेला ‘अ’ दर्जा जिल्हालाच नव्हे तर राज्याला भूषणावह

जिल्हा बॅंकेला मिळालेला ‘अ’ दर्जा जिल्हालाच नव्हे तर राज्याला भूषणावह

जिल्हा बॅक चेअरमन सतीश सावंत यांनी केले स्पष्ट

सिंधुदुर्गनगरी
जिल्हा बँकेने बेकायदेशीर नोकरभरती केली नाही असे स्पष्टीकरण करत जिल्हा बॅंकेला पुन्हा अ दर्जा मिळाला आहे तो जिल्हालाच नव्हे राज्याला भूषणावह आहे, असे जिल्हा बॅकेचे चेअरमन सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबरआतापर्यत 16/17 मधील कर्ज दिले होते ,यातील 300 जणांवर 101 ची कारवाही केली असल्याचे सांगित हा नियमित कर्ज वसूलीचा भाग असल्याचे सांगितले. सतीश सावंत म्हणाले, 2018-19 मध्ये नाबर्डचा अ वर्गांचा दर्जा मिळाला आहे. ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एनपीए ही झिरो टक्के आहे. चार ते साडेचार लाख ठेवीदार यांना कोणत्याही अडचणी न निर्माण करता चांगली सुविधा देण्याचे काम केले आहे. 100 शाखाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. संचालक व कर्मचारी यांनी गेल्या काही वर्षात जे चांगलं काम केल त्याची ही प्रचिती आहे. बॅकेत कोणी राजकारण करू नये. जे कोणी टिका करत आहेत त्यांनी योग्य यंत्रणेकडे दाद मागावी. ही गोरगरीब जनतेची बॅक आहे. जे प्रशासकाची मागणी करत आहेत ते जिल्हा बॅकेची निवडणूक डोळयासमोर ठेवून करत आहेत. या बॅंकेच्या नोकर भरतीबाबत चुकीचे मेसेज पाठवत आहेत. कोणतेही अनधिकृत काम संचालक मंडळाने केलेले नाही. जे काम चालू आहे ते योग्य व शासनाच्या धोरणात्मक निर्णयावर कामकाज चालू आहे. लाभांश बाबतीत योग्य निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. लाॅकडाऊन च्या काळातील व मार्च 2020 पर्यंत जर कोणाची रिकव्हरी पेंडीग असेल तर बॅंकेच्या कर्मचारी वर्गांने जी काही कारवाई केली ती योग्य आहे. दिपक केसरकर यांनी जिल्हा कार्यकारणीत कोणत्याही प्रकारचे नोकर भरतीबाबत चुकीचे विधान केले नव्हते. मात्र एका चॅनलवर ही चुकीची बातमी फिरवली जात आहे. ही राजकीय संस्था नाही तर गोरगरीब जनतेची बॅक आहे. राजन तेली हे नेहमीच राजकीय अडयावर बसणारे आहेत. राजन तेली हे जिल्हा बॅकेचे राजकीय दुकान करू इच्छित आहेत. मात्र हे आम्ही होवू देणार नाहीत. महाविकास आघाडी एकत्र येवून जिल्हा बॅकेची निवडणूक लढवणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेची 300 जणांवर 101 ची कारवाई करण्याचे प्रस्तावित केली आहे. यात बिनशेती, घरदुरूस्ती व गाडयांचा समावेश आहे. यात 12 गाडयांचा समावेश आहे.

यावेळी संचालक व्हिक्टर डाॅन्टस, विकास सावंत, विलास गावडे, प्रकाश गवस, प्रमोद धुरी, आर. टी. मर्गज, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा परब, दिगंबर पाटील उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − five =