कलंबिस्त येथे १७ मे ला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…
सावंतवाडी
कलंबिस्त येथे विजय कदम मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुरस्कृत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन १७ मे ला करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
विजय कदम मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त संघानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विजय कदम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश पास्ते यांनी केले आहे.