You are currently viewing सावंतवाडीत होणाऱ्या जनवादी साहित्य संमेलनाचे नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन….

सावंतवाडीत होणाऱ्या जनवादी साहित्य संमेलनाचे नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन….

संयोजन समिती पदाधिकाऱ्यांची माहिती; मे महिन्यात ७ व ८ तारखेला आयोजन…

सावंतवाडी

येथे मे महिन्यात होणाऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाचे उद्घाटन कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संमेलन समितीचे अध्यक्ष संपत देसाई यांनी दिली.दरम्यान या संमेलनात पर्यावरण विध्वंस,सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर विचारमंथन होणार आहे.मराठा साहित्याला विचार करायला लावणारे हे साहित्य संमेलन ठरणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी समितीचे सचिव अंकुश कदम,राजेंद्र कांबळे, युवराज जाधव,महेश पेडणेकर, दिपक जाधव आदी उपस्थित होते.

श्री देसाई पुढे म्हणाले,मे महिन्यात सात व आठ तारखेला होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार असणार आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ सालीच्या भेटीने ऐतिहासिक महत्त्व आलेल्या सावंतवाडी भूमीत संपन्न होणाऱ्या जनवादी संमेलनाचे उद्घाटन वंचितांच्या बाजूने कलाक्षेत्रात लक्षवेधी हस्तक्षेप करत असलेले चित्रपट दिग्दर्शक श्री मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण कोल्हापूर,सिंधुदुर्ग आणि गोवा या तीन विभागांच्या पुढाकारातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान सावंतवाडीत होत असलेल्या संमेलनाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत आहे. त्यामुळे या संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल,असा विश्वास श्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा