*साळगाव महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “वेड तरुणाईचे ” उत्साहात संपन्न…*
कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “वेड तरुणाईचे” या कार्यक्रमाचे उद्घाटन नेरूर जि.प. मतदार संघाचे विद्यमान सदस्य मा. रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कऱ्हाडकर (पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग) उपस्थित होते. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी संस्था अध्यक्ष मा. मुकुंद धुरी, संचालक श्री. बबन बोभाटे, श्री. शांताराम धुरी सौ. रुद्रा पावसकर व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
🌸 स्वागत व प्रारंभ…
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जनरल सेक्रेटरी कु. सिद्धेश म्हापनकर व संस्कृतीक विद्यार्थी प्रतिनिधी कु. गौरी जळवी. शुभम नेरूरकर यांनी मालवणी गाऱ्हाणे सादर करून कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात केली.
🏆 पारितोषिक वितरण सोहळा…
🔹 मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव (२२ऑगस्ट २०२५, कुडाळ)टी.वाय.बी.कॉम. विद्यार्थिनी कु. सानिया सुनील निंबाळकर हिने मेहंदी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
🔹 राष्ट्रीय सेवा योजना – राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन कॅम्प, अकोला
एफ.वाय.बी.ए. विद्यार्थी कुमार शुभम शाम नेरूरकर यांची निवड.
🔹 कोकण झोन क्रीडा स्पर्धा, कासारवाडी सावर्डे (चिपळूण)
एफ.वाय.बी.ए. विद्यार्थिनी कुमारी श्रुती दत्तात्रय नारिंग्रेकर हिने हॅमर थ्रो प्रकारात द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) पटकावले.
🔹 मुंबई विद्यापीठ स्पर्धा (१५ ऑक्टोबर २०२५)
श्रुती नारिंग्रेकर हिने हॅमर थ्रो मध्ये तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) मिळवले.
🌟 आदर्श विद्यार्थी सन्मान..
आदर्श विद्यार्थिनी: मृणाली नारिंग्रेकर (तृतीय वर्ष वाणिज्य)
आदर्श विद्यार्थी: शिवम पालव (तृतीय वर्ष कला)
🎖 मान्यवरांचा सन्मान…
मा. रुपेश पावसकर व सौ. रुद्रा पावसकर यांचा शाल-श्रीफळ देऊन संस्था अध्यक्ष श्री.मुकुंद धुरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांचा सत्कार श्री. बबन बोभाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.माजी विद्यार्थी कार्यकारी मंडळ अध्यक्ष श्री. जगदीश तेंडोलकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. रमाकांत गावडे व चिमणी पाखर डान्स अकॅडमी, कुडाळचे श्री. रवी कुडाळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
💬 मान्यवरांचे मनोगत..
मा. रुपेश पावसकर यांनी महाविद्यालयाशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त करत ₹५१,००० देणगी जाहीर केली.
पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले व कायदेशीर सहकार्याचे आश्वासन दिले.संस्था अध्यक्ष मुकुंद धुरी यांनी सर्वांचे आभार मानून महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
🎭 सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत…
कार्यक्रमाची सुरुवात “नमो नमो” या गीताने झाली.सुप्रसिद्ध कोरिओग्राफर श्री. आशिष पाटील यांच्या अल्बममध्ये काम केलेली सेलिब्रिटी नृत्यांगना दिक्षा नाईक व चिमणी पाखरे डान्स अकॅडमी, कुडाळच्या कलाकारांनी आकर्षक सादरीकरण केले.
💃 Mitwa (Contemporary Dance) – सिमरन नायर
💫 अवतरली तारका – दिक्षा नाईक व सहकलाकार
🌊 कोळी डान्स – प्रणव, ऋतुराज, निखिल, शुभम, मयुरी, गौरी, सानिया, मृणाली
🎭 कलेश्वर बाल नाट्य मंडळ, नेरूर राईवाडी यांचे पौराणिक दशावतारी नाटक “ओझरचा विघ्नेश्वर” दणदणीत नाट्य प्रयोग सादर करण्यात आला परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी या सोहळ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून आनंद लुटला.
✨ “वेड तरुणाईचे” या संकल्पनेला साजेसा उत्साह, कला, क्रीडा आणि शैक्षणिक यशाचा संगम अनुभवत स्नेहसंमेलनाची शानदार सांगता झाली. ✨
