You are currently viewing मविआ’ चा अंतिम फॉर्म्युला जाहीर होताच उद्धव ठाकरे यांच्या  सभांचा राज्यात धडाका…

मविआ’ चा अंतिम फॉर्म्युला जाहीर होताच उद्धव ठाकरे यांच्या  सभांचा राज्यात धडाका…

मविआ’ चा अंतिम फॉर्म्युला जाहीर होताच उद्धव ठाकरे यांच्या  सभांचा राज्यात धडाका…

कोणत्या जिल्ह्यात कधी होणार सभा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होताच आता उद्धव ठाकरे राज्यात सभांचा धडका लावणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत 21 जागा मिळाल्या आहेत. ज्यात दुसऱ्या टप्प्यात अनेक मतदारसंघ आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटताच उद्धव ठाकरेंच्या सभांचा  धुरळा उडणार आहे. ज्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ , परभणी लोकसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सभा होणार आहे.

महाविकास आघाडीच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आणि जागांचा तिढा सुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा उडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे असलेल्या आणि 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात उद्धव ठाकरे हे 21 ते 24 एप्रिल दरम्यान प्रचार सभा घेणार आहेत. 21 एप्रिल बुलढाणा, 22 एप्रिलला यवतमाळ-वाशिम, 23 एप्रिलला परभणी, 24 एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे भव्य सभा घेणार आहेत.

‘मविआ’च्या संयुक्त सभांना सुद्धा लवकरच सुरुवात

एकीकडे उद्धव ठाकरे या लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेत असताना, लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त सभांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार आहे. संयुक्त सभांचे नियोजन सुद्धा महाविकास आघाडीकडून लवकरच केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार?

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सोबत असलेले अनेक सहकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूकीत मोठं आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे. त्यामुळे 21 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या सभेतून उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा