You are currently viewing फिरत्या फळ विक्रेत्या खलंदरची इमानदारी..

फिरत्या फळ विक्रेत्या खलंदरची इमानदारी..

सावंतवाडीत आपल्या उदरनिर्वाह साठी बाहेरून आलेले काही लोक वेगवेगळे व्यवसाय करतात. असाच हातगाडीवर सावंतवाडी शहरात इतरत्र फिरून फळे विक्री करणारा इसम खलंदर.
दिवसभर उन्हातान्हात फिरून फळे विक्री करून आपली रोजीरोटी चालवणाऱ्या खलंदरला कॉलेज रोड सावंतवाडी येथे रस्त्यात पडलेलं पैशांचं पाकीट मिळालं. पाकिटात साधारण तीन हजारांच्या आसपास रक्कम होती. परंतु मेहनत करून पैसे कमावणाऱ्या खलंदरची इमानदारी त्या पैशांपेक्षा कितीतरी मोठी होती. रस्त्यात मिळालेलं पैशांचे पाकीट कोणाचं याचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. कॉलेज रोड वरील लाईफ लाईन मेडिकलचे मालक प्रशांत पेडणेकर यांच्या मदतीने पाकिटाचे मालक असलेले लोकमान्य को.ऑ.सोसायटीचे विभागीय मॅनेजर श्री.सामंत यांना संपर्क करून त्यांचे पाकीट त्यांना सुपूर्द केलं.
पैशांपेक्षा आपली इमानदारी श्रेष्ठ समजणाऱ्या दिवसभर मेहनत करून पैसे कमावणाऱ्या खलंदरच्या इमानदारीने कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यामुळेच जगात माणुसकी शिल्लक असल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =