You are currently viewing शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त अमरावतीला सात दिवसांचे स्पर्धा परीक्षा शिबीर

शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त अमरावतीला सात दिवसांचे स्पर्धा परीक्षा शिबीर

*मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन*

 

अमरावती –

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात 6 जून 2023 पासून प्रारंभ झाला असून हा राज्याभिषेक सोहळा पूर्ण महाराष्ट्रात 6 जून 2024 पर्यंत चालणार आहे .या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने तसेच इतर विविध संस्थांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अमरावतीच्या डॉ पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाने येत्या 10 मे पासून एक आठवड्याचे ग्रीष्मकालीन राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर 16 मे 2024 पर्यंत आयोजित केले आहे. हे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जवळ असलेल्या मार्डी रोडवरील ग्रीन सर्कल या परिसरामध्ये संपन्न होणार आहे .या शिबिरासाठी वयोगट वय दहा ते पंचवीस हा ठरविण्यात आला असून या परीक्षा स्पर्धा परीक्षा शिबिरात प्रामुख्याने आय ए एस व इतर स्पर्धा परीक्षा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीचे मालुका आयएएस अकादमीचे प्रशिक्षक श्री प्रशांत भाग्यवंत व श्री अंकित राणे यांना प्रामुख्याने निमंत्रित करण्यात आले आहे .या शिबिरामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे . या शिबिरासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था माफक दरात करण्यात आलेली आहे. या शिबिराच्या स्वागताध्यक्षपदी सुप्रसिद्ध संशोधक प्राचार्य डॉ. व्ही.टी. इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय शिबिरामध्ये काही आयएएस आयपीएस आयआरएस तसेच सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी होणार आहेत .डाँ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील नामवंत संस्था असून या संस्थेमार्फत केवळ एक रुपयापासून मध्ये दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्याचे ट्रेनिंग दिल्या जाते. या मुलांना स्पर्धा परीक्षेची त्या त्या वर्गाची पुस्तके विनामूल्य दिली जातात .याशिवाय त्यांची रितसर परीक्षा घेतली जाते.त्यांचे पेपर तपासले जातात. त्यांना गुणपत्रिका दिली जाते व त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. या अकादमीमध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजेच 43 हजार विद्यार्थी असून या अकादमीच्या विविध उपक्रमांमध्ये आतापर्यंत 350 आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व इतर अधिकारी सहभागी झालेले आहेत. फक्त एक रुपयामध्ये कलेक्टर होण्याचे ट्रेनिंग दुसरी पासून देणारी भारतातील ही एकमेव अकादमी आहे. छत्रपती शिवरायांना मानवंदना म्हणून त्यांच्या 350 व्या राज्यभिषेक दिनानिमित्त या राष्ट्रीय शिबिराचे आयोजन केले आहे. स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या किंवा बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या परिपत्रकातून करण्यात आले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी मिशन आयएएस अंतर्गत गेल्या 23 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी नियमितपणे सातत्याने कार्यरत आहे. या अकादमीतर्फे ठिक ठिकाणी विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यात येतात. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी च्या वतीने शिवायन हा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चरित्र ग्रंथ देखील यावेळी प्रकाशित होणार आहे अशी माहिती मिशन आयएएस तर्फे देण्यात आली आहे.

प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस अमरावती.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा