You are currently viewing साळगाव महाविद्यालयात शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन.

साळगाव महाविद्यालयात शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन.

🏰 *साळगाव महाविद्यालयात शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन…*

📍 कुडाळ

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवकालीन इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उदात्त हेतूने साळगाव येथील परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय येथे शिवकालीन ऐतिहासिक साधनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

🗓️ बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी
⏰ सकाळी ९.०० ते दुपारी १.००
📌 स्थळ – महाविद्यालय सभागृह, साळगाव

हे प्रदर्शन सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने, दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संकलित ऐतिहासिक वस्तूंसह, शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

🎖️ उद्घाटन प्रसंगी
शिक्षण प्रसारक मंडळ, झाराप पंचक्रोशीचे अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद धुरी,
संस्था सचिव मा. श्री. प्रदीप प्रभूतेंडोंलकर, मा.श्री.सतीश साळगावकर, सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा सौ.सावली पाटकर, शिवभक्त ज्ञानेश्वर राणे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर,
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अंकिता पवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसरातील सर्व शाळा, माध्यमिक हायस्कूल तसेच नागरिकांसाठी प्रदर्शन खुले राहणार आहे.

इतिहासप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकालीन वैभवाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांनी केले आहे.

🔱 शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव घेण्याची सुवर्णसंधी – जरूर भेट द्या..!

प्रतिक्रिया व्यक्त करा