You are currently viewing झटपट कर्जाचे आमिष दाखवून फसवणुक प्रकरणी “त्या” दोघां विरोधात अखेर गुन्हा दाखल

झटपट कर्जाचे आमिष दाखवून फसवणुक प्रकरणी “त्या” दोघां विरोधात अखेर गुन्हा दाखल

मदोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील काहीनी झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी फसवणूक झालेल्यांनी दोडामार्ग पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी सासोलीतील समिक्षा शशिकांत ठाकूर (वय -२५) व यश विकास परब रा.मुंबई या दोघांच्या  विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सध्या तरी अकरा जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून फसवणुकीची रक्कम तब्बल ६ लाख ३७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.हा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यताही आहे.

सासोलीतील एका युवतीने एका फायनान्स कंपनीमार्फत अनेक जणांना तत्काळ कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून पैसे जमा करून घेतले. अनेक दिवसांचा कालावधी लोटला तरी गुंतवणूकदारांना कर्ज मिळालेच नाही. त्यामुळे अखेर गुंतवणूकदारांनी त्या युवतीकडे रजिस्ट्रेशन फी म्हणून भरलेले पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्या युवतीकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले.

या गुंतवणूकदारांनी येथील पोलीस ठाणे गाठले व सासूलीतील त्या युवती विरुद्ध तक्रार दिली. अमित विलास गवस (साटेली भेडशी) ४२५०० रु., ॲलेक्स इथोरीन सिल्हेरा (कोलझर) ८५००० रु; रामचंद्र सुरेश शेटकर (रा. घोटगेवाडी) ४२५००, गोकुळदास रामा सुतार (साटेली भेडशी) ८५०००, भीमा शिवाजी वर्णेकर (मांगेली) ८५०००, पांडुरंग जयंद्रथ परब (कासारवर्णे, पेडणे, गोवा) ८५०००; मेघा मिथुन बांदेकर (इन्सुली) ८५०००, मुकुंद नारायण आईर (म्हापसा, गोवा) १७०००, रवी गोपाळ आरोसकर (वास्को गोवा) ४२५००, लक्ष्मी लक्ष्मण सावंत (पाटये) २५५००, शितल रामदास गवस (पाटये) १७०००, संगीता रामदास सुतार (पाटये) २५५०० अशी फसवणूक झालेल्यांची नावे असून त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. समीक्षा शशिकांत ठाकूर रा. सासोली व यश विकास परब रा. मुंबई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा