You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक व सदस्य पदी दिपेश परब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपाच्या वतीने सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक व सदस्य पदी दिपेश परब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणी वर उपाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक यांची व सदस्य पदी दिपेश परब बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज वेंगुर्ले भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , वेंगुर्ले पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के.जी. गावडे, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी उपसभापती स्मिता दामले,नगरसेविका श्रेया मयेकर, कृपा गिरप मोंडकर , वृंदा गवडंळकर , रसिका मठकर, आकांक्षा परब , मच्छिमार नेते दादा केळुसकर , मनवेल फर्नांडिस , संजय पुनाळेकर, साईप्रसाद नाईक , प्रशांत आपटे, अशोक कोलगावकर, रवी शिरसाट, शेखर काणेकर , भुषण सारंग आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार संघाचे भरत सातोसकर , अजय गडेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा