You are currently viewing जाऊ कवितांच्या गावा कवयित्री अनुपमा जाधव यांची मुलाखत!

जाऊ कवितांच्या गावा कवयित्री अनुपमा जाधव यांची मुलाखत!

पुणे :

 

दिनांक ५जून रोजी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे, FTII ९०.४०एफ.एम.वर नीता तुपारे यांनी कवयित्री अनुपमा जाधव यांची घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात आली. यामुळे के. एल. पोंदा. हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, सामाजिक कार्यकर्त्या, कथाकार, अनुपमा जाधव यांचे विचार ऐकण्याचे सौभाग्य लाभले.

अनुपमा जाधव यांचा आता पर्यंतचा शैक्षणिक प्रवास,त्यांचे साहित्य लेखन, सामाजिक कार्य,घर, नोकरी, यांची त्यांनी घातलेली सांगड, परिवाराकडून मिळणारा प्रतिसाद, सामाजिक कार्य, जीवन प्रवास, त्यांच्या कवितांचा पाऊस! अशा विविध विषयांवर जाऊ कवितांच्या गावा! अतिशय छान मुलाखत झाली.

उन्हाळी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी दररोज कविता प्रकाशित करुन, वाचन लेखनाची आवड निर्माण करण्यात, पर्यावरण जनजागृती, सामाजिक उपक्रम राबविण्यात आपले असलेले योगदान प्रेरणादायी आहे. मराठी आणि अहिराणी भाषेतील आपल्या कवितांनी विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि समाजातील विविध स्तरांवर सकारात्मक प्रभाव पडत आहे

त्यांच्या कविता अत्यंत प्रभावी,मनमोहक, प्रभावी, प्रेरणादायी असून जीवनातील विचार,अनुभव आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ सुस्पष्टपणे व्यक्त केल्याबद्दल मनापासून कौतुक वाटते. त्यांच्या शब्दांनी जणू स्वप्नांना पंख लागले आहेत.आणि वाचकांच्या अंतरंगात प्रेम, आशा आणि सृजनशीलतेचा उजेड पसरविला आहे. अशा प्रतिभावंत लेखनासाठी, तुम्हाला पुढील लेखन प्रवासासाठी त्यांना चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा