*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित आरती*
जय गजानन श्री गजानन ।। गण गण गणात बोते ।।
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प-१३७ वे
अध्याय-२१ वा, कविता-११ वी
____________________
आज माघ वद्य सप्तमी-शके १९४७ । स्वामींच्या प्रकटदिनी । आनंद माझ्या मनी । आहे विशेष ।।१।।
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प लेखन झाले ।
दर गुरुवारी मी श्री चरणी अर्पण केले । अनुपम दिवस
स्वामी स्मरणात गेले । अहोभाग्य हे माझे ।।२।।
श्री गजानन कृपा झाली । लेखन-प्रतिभा लाभली ।
काव्यांजली शब्दात अवतरली । अनुभूती गुरुकृपेची झाली ।।३।।
पारायण सेवा मज घडते आहे । हे पूर्व-पुण्याईचे फल आहे । कृपाळू स्वामीं । अक्षर-सेवा करवून घेत आहे ।।४।।
या काव्यांजली उपक्रमाला । भक्तांनी प्रतिसाद दिला ।
कृपा-प्रसाद लाभला । इंटरनेट-माध्यमातून ।।५।।
हे लेखन ग्रंथ-रुपात यावे । तुम्ही याचे पारायण करावे ।
कल्याण सर्वांचे व्हावे । हेतू निर्मळ या लेखनाचा ।।६।।
पारायण-सेवा नित्य घडावी ।हीच बुद्धी स्वामींनी द्यावी।
मन:शांती तेणे लाभावी । विनवणी हीच श्रीचरणाशी ।।७।।
सफल-संपूर्ण श्री गजानन कृपेने
*****
भक्त-जन हो –
माघ वद्य सप्तमी-शके १९४७ , दिनांक- ०८ फेब्रुवारी-२०२६, रविवार दिनी-
श्री गजानन विजय-काव्यांजली काव्यपुष्प ” लेखन उपक्रम
कवी अरुणदास” करी अर्पण श्री गजानन चरणी ।।
।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
—————————————-
कवी अरुणदास” अरुण वि. देशपांडे
पाटील नगर- बावधन (बु)-पुणे
9850177342
___________________________
