*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माता सिद्धिदात्री*
कमलासनी देवीमाता सिद्धी दात्री
शोभेसुंदर सहस्त्रदली गर्दगुलाबी
त्यावरी विलोभनीयतेजस्वी आभा
देवीमातेची सात्विक रुपवान छबी
/१/
आज नववी माळ असे सजे सुंदर ,
मयुरबुट्टीने भरली जरतारी पैठणी
मयुरवैविध्याने खुले मोरपंखीसाडी
नीळी, हिरवी, तपकिरी स्वर्णखणी
/२/
अलौकिक असे सौंदर्य, अध्यात्मिक
शांत, तजोमय, स्निग्ध, मुग्ध प्रभास
मायाममता,वात्सल्यी,मनोहारी रुप
स्फुर्तिमय चैतन्याची विविधताखास
/३/
सुगंधीकमलदलातुनि नवोर्मिकिरणे
सिद्धिदात्रिच्या प्रभावे तेजोमयसृष्टी
ब्रह्मदेवाने निर्मिलेपृथ्वीवरसुंदरजीव न वाढे संसार, थांबे उत्पत्तिची सृष्टी
/४/
सुदर्शन चक्र, शंख, गदा पद्म हस्ती
ऐसी देवी दूर करे अज्ञान अंधकार
नवरात्रंदिवस लढुनी देवसाम्राज्य
जिंकिले,पराभव करी दुष्टदैत्यसंहार
/५/
देवीसुचित सृष्टीसंसार विकासा हवे
नरनारी दोनजीवएकत्र बीजांकुरास
शिवशंकर घोर तपस्येने रुप एकात्म
अर्धनारीनटेश्वर, होई प्रदान सृष्टीस
/६/
ऐसा अगाध महिमा सिद्धिदात्रीचा
षोडपोचार करा पुष्पपूजा,फलाहार
पंचमिष्टान्ने, तीळपोळी खास नैवेद्य
क्षमाशरण सांगतेने करु नमस्कार
/७/
स्वप्नगनन्धा सतीश आम्बेतकर,
आर्टिस्ट.
