महायुतीच्या प्रचार सभेत निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या ठाकरे गटातील सरपंच सौ. भक्ति घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडळकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी नेरूर दुर्गवाड येथे आयोजित कॉर्नर सभेदरम्यान हा पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे शिंदे शिवसेनेत स्वागत केले.
या कार्यक्रमाला विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख काका कुडाळकर, जिल्हा परिषद उमेदवार संजय पडते, पंचायत समिती उमेदवार निता नाईक व ममता देसाई, जिल्हा बँक संचालक नीता राणे, अरविंद करळकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, वाळावल सरपंच राजा प्रभू, महिला आघाडी तालुका प्रमुख रचना नेरूरकर, संदेश नाईक, रश्मी नाईक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच भक्ति घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडळकर, माजी उपसरपंच समद मुजावर, लक्ष्मी सडवेलकर, मनोज सडवेलकर यांच्यासह असंख्य ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. तसेच सुशील कदम यांची शिवसेना तालुका सरचिटणीसपदी निवड जाहीर करण्यात आली.
या पक्षप्रवेशामुळे नेरूर देऊळवाडा परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
