You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोगतज्ञ दाखल…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोगतज्ञ दाखल…

उद्या रक्तपेढी अधिकारी देखील होणार हजर; राजू मसुरकर यांची माहिती

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आता नव्याने अस्थिरोगतज्ज्ञ (हाडांची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर) डॉ. निखिल अवधूत हे आता रुग्णालयाला नव्याने रुग्णांना सेवा देण्याचे कार्य करण्यासाठी हजर झाले आहेत. तर उद्या पासून रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी हजर होणार आहेत. अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.

मूळचे बीड या जिल्ह्याचे असून त्यांनी एम.बी.बी.एस.ची पदवी रशिया मध्ये शिक्षण घेऊन पुढील पोस्ट ग्रॅज्युएशन अस्थिरोग तज्ञ ऑर्थो ही पदवी औरंगाबाद येथील खेडगेवार या विद्यापीठामध्ये घेऊन नव्याने सावंतवाडीमध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी हजर झाले आहेत. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला रक्तपेढीसाठी नव्याने ओरोस जिल्हा रुग्णालयातून रक्तपेढी मधून प्रशांत सातार्डेकर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी हे उद्या बुधवार दिनांक 22 डिसेंबर रोजी हजर होणार आहेत.

सध्या रुग्णालयात रुग्णांचा अधिक भार होत असल्याने रात्रीच्या वेळी रक्त चाचणी व अनेक गंभीर रुग्ण रुग्णालयात येतात तसेच सर्पदंशाने अनेक रुग्णांची रक्त चाचणी करावी लागते. यासाठी रात्रीच्या वेळी डॉक्टरांना तसेच रुग्णांना गंभीर प्रसंगाच्या वेळी तोंड द्यावे लागते यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळी अशा रुग्णांची रक्त चाचणी करण्यासाठी रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी उपलब्ध नसल्याने आता अनेक गोरगरीब रुग्णांची चिंता दूर झाली आहे. यामुळे कोल्हापूर उपसंचालक तसेच जिल्हा रुग्णालययाचे सिव्हील सर्जन यांचे असे अधिकारी व डॉक्टर दिल्यामुळे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी रुग्णांच्या वतिने आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा