You are currently viewing जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना आवाहन

जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना याव्दारे कळविण्यात येते की, ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या सेतू सुविधा केंद्रात दुपारी 1.00 वाजेपर्यंत पुढील आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावा.

01.शस्त्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेला Form-A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा. (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे.) 02. मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. 03. परवाना नुतनीकरण करीता फी रु. 2500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्त) शासन जमा करणे आवश्यक आहे. 04. शस्त्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांचेकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र. 05. सरपंच/ पोलीस पाटील/नगराध्यक्ष यांचेकडील दाखला. 06. अर्ज पोस्टाव्दारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नुतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत.

एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नेमलेल्या तारखांनाच त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे.

अ.क्र.

तालुका

नेमून दिलेले दिवस

01

सावंतवाडी

1,2,3 डिसेंबर 2021

02

दोडामार्ग

6,7,8 डिसेंबर 2021

03

वेंगुर्ला

9,10 डिसेंबर 2021

04

मालवण

13,14,15 डिसेंबर 2021

05

वैभववाडी

16, 17 डिसेंबर 2021

06

कणकवली

20,21,22 डिसेंबर 2021

07

कुडाळ

23,24, 27 डिसेंबर 2021

08

देवगड

28,29,30 डिसेंबर 2021

 

तरी संबंधित परवानाधारकांनी याची नोंद घेऊन नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सु्ट्या वगळून) वरीलप्रमाणे कार्यवाही करावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा