You are currently viewing कुडाळ इंद्रप्रस्थनगर येथील ओम गणेश हाऊसिंग सोसायटीच्या महिलांनी जागतिक महिलादिन केला आगळावेगळा साजरा

कुडाळ इंद्रप्रस्थनगर येथील ओम गणेश हाऊसिंग सोसायटीच्या महिलांनी जागतिक महिलादिन केला आगळावेगळा साजरा

कुडाळ इंद्रप्रस्थनगर:

८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळ इंद्रप्रस्थनगर येथील ओम गणेश हाऊसिंग सोसायटीच्या महिला वर्गाने एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

लहान मुलांनी वेशभूषा सादरीकरण उत्तम प्रकारे केले. यात रिया परबने साकारलेल्या जिजाऊने सर्वांची मने जिंकली. तसेच यश जाधवने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वराज मसुरकरने कचऱ्याचा ब्रह्मराक्षस, दुर्वांक गावडे याने संगीत नाटकातील रामलाल, अभ्यंग मसुरकरने भंगारवाला, शमिका आजगावकरने सिंधुताई सकपाळ, नुपूर कर्पेने डॉ.आनंदीबाई जोशी, काव्या लाडने भाजीवाली, दुर्वा आजगावकरने मासेवाली .गोजिरी कर्पेने जिजाऊ, दिव्या लाड गाजर तसेच छोट्या आद्या व अधिशने कृष्णराधाची वेशभूषा साकारली. तर छोट्या बालगोपाळ समर्थ व तस्मईनेही व्यासपीठावर एन्ट्री मारीत सर्वांचे मनोरंजन केले.

महिलांनी फनी गेम्सचा आनंद घेत धमाल केली. रोजच चूल आणि मूल मध्ये व्यस्त असलेली माझी भगिनी आज सर्व बंधने बाजूला ठेऊन जगण्यातील निखळ आनंद घेताना बघून कार्यक्रमाची यशस्वीता दिसून आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =